पुणे, ७ ऑक्टोबर २०२०: पुण्यातील हॉटेल यामध्ये रेस्टॉरंट, बार हे शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कडक आदेश दिले आहेत. तसेच जर कोणी हॉटेल चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने दि. ५ ऑक्टोबर पासून राज्यातील हॉटेल सुरू करण्याबरोबरच सूचना करत ( sop )अंतर्गत शर्ती व अटी घालून हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिली आहेत. याबाबतीत महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, वन विभाग, यांनी आदेश क्र. डीएमयु /२०२०/सी आरए २/ डी आयएसएम – १ दि ३०-९-२०२० मध्ये नमूद केले प्रमाणे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलेल्या विहित मानक कार्यप्रणाली ( sop ) नुसार अटी व शर्ती घातल्या आहेत.या शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.
व्यवसाय करत असताना कोणत्याही स्वरूपात कोरोना ( कोविड १९ ) चा प्रसार होणार नाही, संसर्ग वाढणार नाही या पद्धतीने दक्षता घेणे गरजेचे आहे. असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव