मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस बॉयचे काम करणारा एक व्यक्ती आज बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच छाप पडली आहे.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’, ‘शीरिन फरीदी की तो निकल पडी’ सारख्या चित्रपटांमुळे त्यांचे नाव रसिकांच्या ओठी आहे. आपण बोलत आहोत बोमन इराणी यांच्या बद्दल. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त जाणून घेऊ त्यांची स्ट्रगल स्टोरी..
बोमन इराणी यांची रिअल लाईफ स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. त्यांनी वयाच्या चाळीशीत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्या अगोदर त्यांनी हॉटेलमध्ये वेटर ते रस्त्यावर फोटो विकण्याचे कामही केले आहे.
एक फेसबुक पेजवर त्यांची स्ट्रगल स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. त्यात त्यांनी सविस्तर खुलासा केला होता. बोमन इराणी यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. ते वेफर्सचे दुकान चालवायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर आई ते दुकान चालवत.
त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. पण नाटक आणि इतर कलांमध्ये ते नेहमी सहभागी होत. कॉलेजनंतर कुटुंबीयांची मदत करण्याच्या हेतूने त्यांनी काम करायचे ठरवले. त्यांनी ताज हॉटेलच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांना रुम सर्व्हिसचे मिळाले. अखेर दीड वर्षानंतर तिथल्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम मिळाले.
थोडी गाडी सुरळीत झाले असे वाटताना त्यांच्या आईचा अपघात झाला. त्यामुळे त्यांनी काम सोडून आईचे दुकान चालवण्याचे ठरवले. या दरम्यान अनेक वर्षे गेली. त्यांचं लग्न झालं, मुलंबाळं झाली पण आयुष्यात कसलीतरी कमतरता असल्याचे त्यांना सतत जाणवत.
यानंतर त्यांना पत्नीने प्रोत्साहन केले. ते फोटोग्राफी करू लागले. एकदा फोटोग्राफी करताना त्यांना एका मित्राने जाहिरातीच्या ऑडीशनसाठी बोलावले. त्यांची निवड झाली आणि काही वर्षांत त्यांनी तब्बल १८० हून अधिक जाहिरातींमध्ये तसेच काही लोकप्रिय नाटकांमध्येही काम केले.
एवढ्या खडतर प्रवासानंतर त्यांना एका लघुपटाची ऑफर मिळाली. त्याचे बजेट कमी होते. मात्र ती सुवर्णसंधी होती. कारण हा लघुपट पाहून विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले.
यानंतर त्यांचे आयुष्यचं पालटले. विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना २ लाख रुपयांचा चेक दिला आणि त्यांच्या आगामी चित्रपटात संधी दिली. मग त्यांचा स्वप्नवत करिअर प्रवास सुरू झाला
बोमन इराणी यांना “न्युज अनकट” टिमकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!