मालेगाव, नासिक, २३ फेब्रुवारी २०२४ : मालेगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल लाभार्थी मेळावा आज मालेगावमध्ये संपन्न झाला. त्या अंतर्गत नाशिक जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास योजना व मालेगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल लाभार्थी मेळावा, शबरी आवास, रमाई आवास, मोदी आवास योजनेचे घरकुल बांधणे मंजुरी आदेशाचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मालेगाव बाह्य मतदार संघातील सर्व गावातील सर्व योजनांचे १८७० लाभार्थ्यांना घरकुल बांधणे मंजुरीचे आदेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, चंदनपुरी सरपंच विनोद शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष लाभार्थी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे