३४ रुपयांचा दर कसा परवडेल? दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल

वाल्हे, १८ जुलै २०२३ : राज्य सरकारने दुधाचा किमान दर ३४ रुपये निश्चित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला आता चांगला भाव मिळेल, अशी चर्चा नोकरदार वर्गात सुरू आहे. शेतकऱ्यांनी मात्र याबाबत असमाधान व्यक्त करीत दूधाला किमान ३९ ते ४१ रुपयांचा दर मिळायला पाहिजे असे म्हटले आहे. हा दर आम्हाला परवडत नसल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

दूधाचा उत्पादन खर्च सध्या सरासरी एका लिटरला ३७ ते ४० रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे सध्या मिळणारा दर हा अपुरा असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सरकारने किमान दर निश्चित करताना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असेल, तरच हा दर मिळणार आहे. त्यांच्यापेक्षा कमी फॅट असलेल्या दूधाला प्रत्येक पॉईंटला ५० पैसे कमी असा दर मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

दूधाला किमान ३९ ते ४१ रुपये भाव मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. शासनाने अगोदर पशुखाधाचे दर कमी करावेत व दूध दरात किमान ६ ते ७ रुपये प्रतिलिटर वाढ करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा