तुम्ही कोरोनाच्या किती जवळ आहात ?

पुणे, २९ एप्रिल २०२०: एकूणच कोरोना चा प्रभाव पाहता अजूनही लोकांमध्ये याविषयी फारशी जागृती झालेली दिसत नाही. हा विषाणू कोणत्या मार्गाने तुमच्या घरात घुसू शकतो याचा अंदाज देखील बांधता येणार नाही. दिवसभरात तुम्ही भरपूर हालचाल करत असता. काही वस्तू आणणे असो किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर जाणे असो, परंतु तुमची एक चूक सुद्धा तुम्हाला कोरोना च्या जवळ घेऊन जात आहे. तुम्ही कोरोनाच्या किती जवळ आहात हे तपासण्यासाठी पुढे एक गुन पत्रिका बनवली गेली आहे.

या गुणपत्रिका मध्ये दिवसभरात होत असणारे वेगवेगळे कार्य दिले आहेत. प्रत्येक कार्याचे गुण दिले गेले आहेत. दिलेले गुण मिळून घ्या आणि गुणपत्रिके नुसार आपला फोरोना संक्रमणाचा धोका पडताचून पहा.

१. जर तुमच्या घरात पेपर येत असेल तर-१ गुण

२. जर तुमच्या घरात प्लॅस्टिक च्या पॅकिंग मध्ये वस्तू येत असेल तर-१ गुण

३. जर तुमच्या घरात न्हावी येत असेल तर-२ गुण

४. जर तुम्ही लपून छपून न्हावीच्या दुकानात जात असाल तर-३ गुण

५. जर तुमच्या घरात धोबी येत असेल तर-२ गुण

६. जर तुमच्या घरात धुणेभांडी आणि झाडलोट करणारी बाई येत असेल तर-३ गुण

७. जर तुमच्या घरात पिशवी बंद दूध येत नसेल तर-१ गुण

८. जर तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जात असाल तर-३ गुण

९. जर तुम्ही घरा बाहेर गप्पा मारण्यासाठी जात असाल, किंवा टाईम पास म्हणून
फिरायला जात असाल तर, आणि घराच्या आत बाहेर करत असाल तर-२ गुण

१०. जर तुम्ही ऑफिस साठी किंवा उदयोग धंदयासाठी घरा बाहेर जात असाल तर-३ गुण

११. जर तुम्ही किराणा माल व इतर सामान दर दिवसाड मागवत असाल तर-२ गुण

१२. जर तुम्ही किराणा माल व इतर सामान दर दिवसाड आणण्यासाठी घरा बाहेर जात असाल तर-२ गुण

१३. जर तुम्ही नोटा आणि पैशांची देवाण घेवाण माल खरेदी व विक्री करण्यासाठी
करत असाल तर-१ गुण

१४. जर तुमच्या घरात पाहुणे मंडळींची ये जा होत असेल तर-३ गुण

१५. जर तुम्ही स्वतः बाहेरून आल्यावर साबण लावून गरम पाण्यानी अंघोळ
तसेच स्वतःचे कपडे व बाहेरून आणलेले वस्तू धुवत नसाल तर-४ गुण

गुणपत्रिका
१. धोका नसल्या सारखे-o-४ गुण

२. थोडासा धोका, सावध राहणे गरजेचे आहे- ५-१० गुण

३. गंभीर धोका आहे. तुम्ही तुमची राहणीमान व वागणुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- ११-१७

४. अधिक गंभीर धोका आहे. तुमचे सर्व गतिविधी थांबाबे, घरातील
सदस्यां पासून स्वतःला दूरी ठेवा आणि तुरंत हेल्पलाईन बर संपर्क करून डॉक्टरां कडून तपासणी करून घ्यावी.- १८-३४

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा