पुणे, १७ ऑगस्ट २०२२: ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या उत्तराधिकारीपदाची शर्यत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात आहे. मात्र, आता सर्वेक्षणाच्या निकालावरून सुनक यांचं स्वप्न भंग पावलं आहे.
खरंतर, सर्वेक्षणात परराष्ट्र मंत्री ट्रस यांनी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सुनक यांच्यावर बाजी मारली आहे. यापैकी एक म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत चालणाऱ्या मतदानात पक्षाच्या सदस्यांनी पुढील पंतप्रधान म्हणून निवड केली पाहिजे.
यामध्ये जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांचा मार्ग आता सोपा दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या सर्वेक्षण आकडेवारीवरून असं दिसून आलंय की लिझ ट्रस ऋषी सुनक यांच्यावर आघाडीवर आहेत. नवीन पंतप्रधानांसमोर कोणतं मोठं आव्हान आहे. परिणाम काय होतील? कंझर्व्हेटिव्ह पक्षात नेता निवडण्याची प्रक्रिया काय असते ते जाणून घेऊया.
ब्रिटनमध्ये, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी किमान २० खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. नामांकन केल्यानंतर, पहिल्या मतपत्रिकेचं मतदान होतं. यामध्ये ३० पेक्षा कमी मतं मिळविणारा उमेदवार शर्यतीबाहेर आहे.
यानंतर, पहिल्या मतदानात विजयी उमेदवार दुसऱ्या मतदानात भाग घेतो. ज्या उमेदवाराला कमीत कमी मतं मिळतात तो स्पर्धेतून बाहेर होतो. या प्रक्रियेत मतदानाच्या अनेक फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीत उमेदवारांची संख्या कमी होत जाते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत फक्त दोन उमेदवार उरले नाही तोपर्यंत पक्षांतर्गत मतदान सुरू असतं.
पक्षाचे सदस्य पोस्टल मत देतात आणि नेता निवडतात. विजई उमेदवाराकडं पक्षाचे नेते तसेच पंतप्रधानपद असतं. पक्षाचा नेता म्हणून जो उमेदवार निवडला जाईल तो ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान असेल हे उघड आहे.
माजी आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि परराष्ट्र कार्यालय मंत्री रहमान चिश्ती आणि परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स हे शर्यतीत लवकर बाहेर पडले. या उमेदवारांना २० खासदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळं त्यांना पहिल्या निवडणुकीत भाग घेता आला नाही.
त्यानंतर झालेल्या पहिल्या मतदानात, माजी राज्य सचिव जेरेमी हंट आणि चांसलर नदीम जाहवी यांना टोरी खासदार (कंझर्व्हेटिव्ह खासदार) कडून किमान ३० मते मिळवता आली नाहीत, त्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. दुसऱ्या मतदानात अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांना सर्वात कमी मतं मिळाली, त्यामुळं त्याही बाहेर पडल्या.
१२ जुलै रोजी पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद झाली होती. यासाठी प्रत्येक नेत्याला २० खासदारांच्या पाठिंब्याची गरज होती. १३ जुलै रोजी पहिल्या फेरीचं मतदान झालं. ३० पेक्षा कमी मतं मिळालेले उमेदवार रिंगणाबाहेर गेले.
१४ जुलै रोजी दुसऱ्या फेरीचं मतदान झालं. या मतदानात सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार शर्यतीतून बाहेर पडला. १८ ते २१ जुलैपर्यंत दोन उमेदवार होईपर्यंत सतत मतदान होणार आहे. यानंतर पक्षाच्या सदस्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरातील शेवटच्या दोन उमेदवारांना मतदान केलं.
यानंतर ५ सप्टेंबरला नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. त्यामुळं सध्या या पदापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही उमेदवारांना अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. जर गोष्टी अंतिम टप्प्यात न गेल्यास ५ सप्टेंबरची तारीख आणखी वाढवली जाऊ शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे ते निश्चित नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे