कसं करावं.. कसं जगावं… व्यापारीवर्ग नाराज, पण सरकार मात्र गप्प

मुंबई जुलै १३ २०२१ : छोटेखानी कार्यक्रम होतात, सरकारची निदर्शने होतात, मग आम्ही काय घोडं मारलंय, असा सवाल करतोय समस्त व्यापारी वर्ग. विधानसभेच्या वेळी करण्यात आलेली निदर्शन, त्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन. इथपर्यंत न थांबता पिकनिक, सहली असे अनेक सोहळे सुरुच आहेत. पण जेव्हा व्यापारी वर्ग सरकारला विनंती करतो की तुम्ही एक तर निर्बंध कडक करा किंवा पूर्ण सुरुवात करा, अशा वेळी सरकार कुठलेच उत्तर देत नाही. एकीकडे गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे दुकाने पूर्ण बंद होती. जेवढा वेळ उघडी तेवढ्या वेळात होणा-या गर्दीमुळे पोलिसांचा ससेमिरा सतत मागे. यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. जगावं की मरावं अशा विवंचनेत व्यापारीवर्ग अडकला. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही येणार यावर आता जरी निश्चितता नसली, तरी जनतेचं वागणंदेखील तितकचं बेशिस्तिचं आहे. बुशी डॅम, सिमला, कुलू, मनाली इथे केलेली लोकांनी गर्दी, हे कोरोनाला नक्कीच आमंत्रण देणारं ठरणार आहे, त्यामुळे की काय आता, व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. यावेळी बोलताना दुकानदार तोंडे म्हणाले की सकाळी ७ ते दुपारी चार ही वेळ नक्कीच आम्हाला उपयोगाची नाही. लोकांमुळे दुकानदारांना त्रास होतो आहे. त्यामुळे एकतर सरकराने संपूर्ण निर्बंध घालावेत किंवा संपूर्ण दुकाने उघडावीत. मागचा सणाचा मौसम गेला. पण यावेळी तरी सरकारने आम्हाला व्यवसाय करु द्यावा, असे व्यापारांचे मागणे आहे. संपूर्ण नियमानुसार सर्व दुकाने उघडा आणि व्यवसाय करुन पोटं भरु द्या. आणि जर पूर्ण बंद केलं तर व्यापारी आणि त्यांच्या कुटूंबाची जगण्याची सोय करा. असा व्यापा-यांचा सूर आहे. सरकार काय पावलं उचलणार, हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा