अमेरिकेतील टेक्सासमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के ! टेक्सासच्या इतिहासातील चौथा सर्वात शक्तिशाली भूकंप

टेक्सास, १७ डिसेंबर २०२२ :अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सास शहरात शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत. अमेरिका भूगर्भीय सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ही ५.४ रिश्टर इतकी आहे. टेक्सासच्या इतिहासातील हा सर्वात शक्तीशाली भूकंप म्हणून नोंदवला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हा पश्चिम टेक्सासमधील मिडलँड शहराच्या उत्तर-वायव्येपासून २३ किलोमीटर दूर आणि जमिनीपासून ९ किलोमीटर खोल होता. या भूकंपानंतर मिडलँडच्या हवामान विभागाच्या कार्यालयाने ट्विट केले आहे की, हा टेक्सासच्या इतिहासातील चौथा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. दरम्यान, टेक्सासच्या पश्चिम भागात ज्या ठिकाणी हा भूकंप झाला, ते तेल उत्खननाचे ठिकाण आहे. यामध्ये अद्यापतरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

कोलोरॅडोमधील यूएसजीएसच्या राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रातील भूभौतिकशास्त्रज्ञ जना पर्स्ले यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के १५०० पेक्षा अधिक नागरिकांना जाणवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या भूकंपानंतर लगेचच कमी तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा