रोहा शहरात सापडला मोठा शस्त्रसाठा आणि प्राण्याचे अवशेष…  

रोहा, रायगड, ९ जानेवारी २०२४ : रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. शहरातील धनगर आळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोकटे वय वर्ष  २४ याच्या राहत्या घरात पोलिसांनी  धाड टाकली असता तिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि प्राण्यांचे अवशेष सापडले. यात एक  रिवॉल्वर,५ बंदुक,३९  काडतूस,३ तलवारी, ५ लोखंडी काती, १ चॉपर, ५ चाकू, कोयता, २४ दारूगोळाची  पाकिटे, शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष त्यामध्ये जनावरांचे शिंग,भेकराचे १४ जोड, सांबर ५ जोड, काळवीट १ जोड, चौसिंगा २ जोड यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडालीय. सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई  रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीमने केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अक्षय जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा