परतीच्या पावसाने इंदापुरात शेतमालाचे प्रचंड नुकसान….

इंदापूर, १५ ऑक्टोबर २०२० : हाताने हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले वाहून तर काही ठिकाणी पूल पाण्यात गेल्याने दळणवळण विस्कळीत.बुधवारी दिनांक १४ रोजी इंदापूर तालुक्यात पावसाने हाहा:कार माजविला यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे तसेच शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस तसेच अनेक फळबागा यामध्ये जमीनदोस्त झाल्या आहेत. तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाची तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेततळी बंधारे तलाव फुटल्याने अनेकांच्या शेतातील माती वाहून गेले आहे तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत.

इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत काही ठिकाणचा सेवा रस्ता खचल्याने तसेच इतरही कच्चे रस्ते वाहून गेल्याने काही ठिकाणांचा संपर्कच तुटला आहे.अनेकांच्या घरात पाणी असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले तर काहींच्या पोल्ट्रीमध्ये देखील पाणी गेल्याने पोल्ट्री व्यावसायिक यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

अनेकांच्या गाड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या गाडीसोबत पाण्यात वाहून जाणाऱ्या लोकांना स्थानिकांनी वेळीच वाचवल्याने मोठा अनर्थ टळला. तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य स्थितीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती याची पाहणी संबंधित प्रशासनाचे अधिकारी करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा