ह्यूमन रोबो होणार तुमच्या सेवेत हजर…

अमेरिका, २ ऑक्टोबर २०२२: तुम्हाला काम करायचा कंटाळा आला असेल तर डोन्ट वरी. तुमच्याकडे काम करायला आता तुमचा हक्काचा रोबो असेल. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी हे स्वप्न सत्यात आणले आहे.
ह्युमनॉइड रोबोट लॉन्चइलॉन मस्क हे फक्त जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जात नाहीत, तर नवीन तंत्रज्ञानाला चालना देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची टेस्ला ऑटो पायलट कार, लोकांना मंगळावर नेण्याचा प्रकल्प, याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. यातच आता शुक्रवारी, मस्क यांनी एका कार्यक्रमात ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस लॉन्च केला आहे.

रोबोट माणसांप्रमाणेच काम करतो. रोबोटच्या अनेक फीचर्सने जगाला चकित केले आहे. हा रोबोट उद्योग कार उद्योगापेक्षा अधिक यशस्वी होईल, असा मस्क यांना विश्वास आहे. इव्हेंटमध्ये या रोबोटचा प्रोटोटाइप स्टेजवर उतरवण्यासोबतच, त्याचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये हा रोबोट बॉक्स उचलताना, झाडांना पाणी देताना आणि माणसांसारखी कामे करताना दिसत आहे.

या रोबोटचे पुढील वर्षीपासून उत्पादन सुरू होऊ शकते. असे मस्क यांनी नमूद केले. तसेच शक्य तितक्या लवकर याला आणखी प्रगत ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचा आमचा उद्देश आहे.
असेही मस्क यांनी सांगितले.

रोबोटसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा लवकरच येणार आहे. हा रोबोट अनपेक्षित परिस्थिती हाताळू शकतो की नाही, याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

लवकरच हे रोबो सगळ्यांच्याच दिमतीला हजर असतील, असा विश्वास मस्क यांनी व्यक्त केला. Robo will do your work .. you relax and chill

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा