सिद्धनेर्लेत दुधगंगा नदी पात्रात मानवी कवट्या आढळल्याने खळबळ

8

कागल, १ जुलै २०२३: सिद्धनेर्ले तालुका कागल येथील दुधगंगा नदी किनाऱ्याजवळ, नदी पात्रात अज्ञात व्यक्तींच्या डोक्याच्या चार कवटी आढळून आल्या. सकाळी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लोकांना या कवट्या निदर्शनास आल्या. त्यानंतर कागल पोलिसांत याबाबत कळविण्यात आले.या कवट्यांमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

या बाबत अधिक माहिती अशी की, दुधगंगा नदी पात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी येत असतात.आज नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने मानवी व्यक्तीचा फक्त डोक्याचा भाग दिसून आला. त्यांने ताबडतोब पोलिसांना फोन करून याविषयी माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले व मानवी कवटी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच परिसरात आणखी तीन कवट्या आढळून आल्याचे समजताच कागल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पुन्हा रवाना झाले. व उर्वरित कवट्याही ताब्यात घेण्यात आल्या.

या मानवी कवट्यांवर कोणत्याही प्रकारे मांस नसल्याने ह्या किती दिवसांपूर्वीच्या आहेत, हे सांगता येत नाही. या कवट्या येथे कश्या आल्या, आणि एकाच ठिकाणी चार कवट्या सापडल्या असल्याने मोठे गूढ निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या मानवी कवट्या सापडल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा नेमका काय प्रकार आहे, याचा कागल पोलिसांनी अधिक तपास चालू केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा