जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाल्हे येथे शंभर लोकांनी केले रक्तदान

पुरंदर दि.१४ जून २०२० : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधत प्रा.दिगंबर दुर्गाडे मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात दिवसभरात शंभरहुन अधिक तरुणांनी रक्तदान केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शऩाखाली आज रविवार (दि.१४) जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, सुर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, प्रा.संतोष नवले, हनुमंत पवार, सुनिता ढोबळे, बबनराव चखाले, धनंजय पवार, डॉ.रोहिदास पवार, दादा मदने आदि उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सहभागी सर्व रक्तदात्यांना मास्क, सॅनिटायझर, बिस्कीट, चहा देण्यात आला. शिबिरामध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रा.दुर्गाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा