कोरोनानंतर भारतावर आता “अम्फान” चक्रीवादळाचे संकट

10

नवी दिल्ली, दि१६मे २०२० : भारतासह जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. भारत देश संकटात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने एक महत्वाची बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (शनिवारी) बंगालच्या उपसागरात अम्फान नावाचे चक्रीवादळ वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.

या वादळामुळे अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या परिणाम देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात होऊ शकतो.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवार आणि रविवार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मच्छीमारांना बंगालच्या उपसागरात न जाण्याचा इशाराही खात्याने दिला आहे.

हवामान खात्याकडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ वादळाच्या वातावरणाबाबतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील किनारपट्टी भागात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: