लाॅकडाऊन मध्ये लग्नाची घाई, नवरी पळाली बाॅयफ्रेंडसोबत….

5

श्रीगोंदा. २८ जुलै २०२०: मित्रांनो लाॅकडाऊनचा काळ असला तरी अनेक लग्न या काळात झाली. अनेक लग्नात तर कोरोनाने हजेरी देखील लावली आणि… पुढे काय तर नवरा बायको सह वऱ्हाडच क्वांरनटाईन झाले. तर कुठे मांडवातून नवराच गायब झाला अशा अनेक विविध घटना देखील या लाॅकडाऊन काळातील लग्नात घडल्या.

अशीच, एक घटना अहमदनगर जिल्हातील श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात घडली. इथे नव-याच्या हातावर तुरी देत नवरी हि बाॅयफ्रेंड सोबत पळून गेली. तरुणीचे लग्न लाॅकडाऊन आणि कोरोनाच्या काळात २५ जूनला झाले होते. ८ दिवसानंतर ती माहेरी परतली आणि तिथे दिड लाखाचे दागिने घेऊन तीने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. नवरदेवाच्या फिर्यादीवरुन तरुणी आणि तिचा प्रियकर संदेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हे पोलिस करत आहे.

म्हणुनच मित्रांनों या लाॅकडाऊनच्या काळात लग्नाची जास्त घाई न करता योग्य त्या वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. नाही तर असे परिणाम भोगावे लागतील. लाॅकडाऊनमुळे लग्न कार्यावर अनेक निर्बंध आले आणि लग्न हि पार पडू लागली हे एक दृष्टीने बरोबर असले तरी जास्त घाई न करता संयमाने निर्णय घेणे हे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा