वडोली येथे शेताच्या कारणावरून भांडण पती-पत्नीस पोलीस कोठडी

माढा ,दि.७ आँक्टोंबर २०२० :माढा तालुक्यातील वडोली येथे शेताच्या कडेने सरकारी चारी का काढली व दगडी ताल का बुजविली यावरून झालेल्या भांडणात बंडगर व काळे यांच्यात हाणामारी होऊन दोनजण जखमी झाले असून सरपंच प्रतिनिधी बंडगर यांच्या दंडाला महिलेने चावा घेऊन तर त्यांच्या पतीने लोखंडी सळईने मारून हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी पतीपत्नीस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

या भांडणात दोन्हीकडील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता.याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे वडोली येथे गावात जात असताना सुभाष काळे व त्यांची पत्नी उर्मिला काळे या दोघांनी शेताच्या कडेने सरकारी चारी का काढली असा जाब विचारून सरपंच प्रतिनिधी आप्पा बंडगर यास काळे पती-पत्नीने लोखंडी सळईने खांद्यावर मारून हाड फ्रॅक्चर करीत चावा घेतल्याची घटना घडली आहे.

सदर घटनेतील सुभाष काळे व उर्मिला सुभाष काळे हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची आई व वडील आहेत.

याबाबत आप्पा किसन बंडगर (वय-२९)याने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.०२ ऑक्टोबर रोजी सकाळी मोटर-सायकलवर गावात जात असताना सुभाष काळे व उर्मिला सुभाष काळे यांनी रस्त्यात आडवून तू आमच्या शेताच्या कडेने सरकारी चारी काढली असा जाब विचारून सुभाष काळे याने हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली.यावेळी खाली पडल्यावर त्यांची पत्नी उर्मिला काळे यांनी गच्चीला धरून उजव्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतला अशी फिर्याद दाखल केली आहे.

तर उर्मिला काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,अर्चना आप्पा बंडगर व आप्पा बंडगर यांनी येऊन ओड्याच्या बाजूला तुम्ही दगडाची ताल का बुजविली असे विचारून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून साडी,ब्लाउजला धरून खाली ढकलून दिले. बापू बंडगर याने साडी हिसकावून फेकून देवून छेडछाड केली अशी एकूण आठ जनवराती फिर्याद दिली होती.

टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन्ही कडील दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
टेंभुर्णी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून आज मंगळवारी माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काळे पती-पत्नीस एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर बंडगर पती-पत्नीसह इतर सहाजणांची जामिनावर सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ स्वामीनाथ लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा