औरंगाबाद, ७ ऑगस्ट २०२०: कोरोनाने राज्याला वेठीस धरले आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले. कोरोना राज्यालाच काय तर जगभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने लाखो निष्पाप लोकांचे जीव घेतले. तर अनेक जणांनी या आजराला घाबरुन स्वत:चे जीवन संपवले. तर अनेकांनी आपलं कोणतरी गेलं म्हणून देखील असे आत्महत्येचे पाऊल उचलले. अशीच घटना घडली आहे औरंगाबादमधे.
औरंगाबादमधे पतीचे कोरोनामुळे निधन झाले म्हणुन पत्नीने दोन जुळ्या मुला मुलीसह ब्लेडने हाताच्या नसा कापल्या. या घटनेमध्ये मायलेकींचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा सुदैवाने बचावला आहे. समीना रुस्तम शेख (४२) आयशा (१७)असे मृत मायलेकीचे नाव आहे. तर समीर शेख या घटनेतून वाचलेल्या मुलाचे नाव आहे. असे कृत्य करण्याआधी तिघांनी सुसाईड नोट लिहली आणि ब्लेडने दोन्ही हातांच्या नसा कापून घेतल्या.
या घटनेमुळे परिसरात शोक पसरला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एका विषाणुने समीरकडून त्याचे संपुर्ण कुंटूब हिरावून घेतले आणि आज घडीला त्याला एकटे सोडले. समीरवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कळाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी