हैदराबादच्या स्टेडियममधील एका स्टँडला आता अझरुद्दीनचे नाव

हैदराबाद : येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे नाव बदलून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे नाव देण्यात आले आहे.
अझरने भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अझरवर मॅच फिक्सिंगचा आरोप काही वर्षांपूर्वी लावण्यात आला होता.
यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कालांतराने त्याच्यावरील हि बंदी उठवण्यात आली व तो पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रिय झाला.
सध्या अझर हैदराबाद क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. या वर्षी २७ सप्टेंबरपासून अझरने अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली आहेत.
दरम्यान, अझरुद्दीनच्या नावाच्या या स्टँडचे आज अनावरण, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. हा स्टँड व्हीव्हीएस लक्ष्मण पेव्हेलियनच्या वरच्या बाजूला असणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा