अंमली पदार्थांचे जाळे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता ‘हायड्रोपोनिक गांजा’ (Hydroponic Ganja) ही नवी डोकेदुखी पुणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे. नुकत्याच विमानतळावर १३.७२ कोटी रुपयांचा हा विशेष गांजा जप्त करण्यात आला.
हायड्रोपोनिक गांजा म्हणजे माती व सूर्यप्रकाशाशिवाय फक्त पाण्यातील पोषक तत्त्वे आणि कृत्रिम दिव्यांच्या साहाय्याने तयार होणारा गांजा. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत हा गांजा बंद खोल्यांमध्ये सहज उगवता येतो. त्यामुळे शोध घेणे कठीण बनते.
एक किलो हायड्रोपोनिक गांजाची किंमत तब्बल २ ते ३ लाख रुपये असल्याने तरुण वर्ग आर्थिक फायद्यासाठी या धोकादायक मार्गाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे, नव्या तंत्रज्ञानावर आधारित या बेकायदेशीर लागवडीवर अंकुश ठेवणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले