गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पितृ पंधरवड्यात भाज्यांचे दर कोसळले, ग्राहकांना दिलासा!

पितृ पंधरवड्यात भाज्यांचे दर कोसळले, ग्राहकांना दिलासा!

पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या दरवाढीचा अनुभव नेहमीच ग्राहकांना येतो. मात्र यंदा परिस्थिती उलटी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आणि बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याने, मार्केट यार्डमधील दर तब्बल २० ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत.

भेंडी, गवार, लाल भोपळा, कारली, देठ आणि मेथी यांसारख्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक मुबलक झाली असून, त्यांच्या गुणवत्तेतही चांगली सुधारणा दिसून येते. सध्या भेंडी ८० ते १०० रुपये, गवार १०० ते १४० रुपये आणि मेथीची जुडी २० ते २५ रुपयांना सहज मिळत आहे.

या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, पितृपक्षातील खरेदी अधिक सोयीस्कर झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील नवरात्रोत्सवातही भाज्यांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version