ह्युंदाई ऑरा लाँच, ६ लाखांपेक्षा कमी किंमत

नवी दिल्ली: अनुभवी ऑटो कंपनी ह्युंदाईची मोस्ट अवेटेड कॉम्पॅक्ट सेडान असलेली ऑरा बाजारात आली आहे. बीएसव्हीआयची ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरूवात किंमत ६ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणजेच ५.७९ लाख रुपये. अशा परिस्थितीत ऑरा हा मध्यमवर्गीय कुटूंबासाठी बजेट कार म्हणून पर्याय ठरू शकतो. परंतु अव्वल व्हेरिएंटची किंमत रु.९.२२ लाखांवर जाते. ह्युंदाईची ऑरा ६ कलर ऑप्शन्समध्ये येईल – फायरी रेड, पोलर व्हाइट, टेफून सिल्लर, टायटन ग्रे, अल्फा ब्लू आणि व्हिंटेज ब्राउन असे कलर्स असतील.

हुंडईने १९ डिसेंबर २०१९ रोजी ऑरा कारची प्रथम झलक दर्शविली. २ जानेवारी रोजी ह्युंदाईने “ऑरा” चे बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. या कारचे बुकिंग केवळ १० हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. ह्युंदाईच्या ऑरा कारचे बुकिंग कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा त्याच्या डीलरशिपद्वारे केले जाऊ शकते.

ह्युंदाईच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक कार्डांनाही बुकिंगवर १० टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय काही अटींसह शून्य प्रक्रिया शुल्क आणि ऑन-रोड फायनान्सची सुविधादेखील उपलब्ध आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा