मी गुन्हेगार नाही…अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली; १९ जुलै, २०२२ : सध्या कोण गुन्हेगार आणि कोण निर्दोष हे राजकारणात समजणं म्हणजे तुम्हाला समोरचा माणूस वाचता येण्याइतकं गंभीर आहे. त्यात सध्या आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केंजरीवाल यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे. आधी अरविंद केजरीवाल यांना सिंगापूर व्हिसा नाकारला होता. पण आता मात्र अरविंद केजरीवाल यांना वर्ल्ड सीटीज समिटमध्ये सामील होण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली नाही. त्यामुळे आता ते या परिषदेत सामील होतील का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यावर अरविंद केजरीवाल यांनी संतप्त होत माध्यमांना सांगितले की, मी गुन्हेगार नाही, दिल्लीचा मुख्यमंत्री आहे. मला परवानगीला उशीर करण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
या वर्ल्ड समिटसाठी सिंगापूर सरकारने मला खास आमंत्रण दिल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले. यावेळी तिथे दिल्लीचे मॉडेल मी सादर करणार असून ही देशासाठी गौरवाची बाब आहे. गेले महिनाभर मी या परवानगीसाठी केंद्र सरकारच्या मागे लागलो असून, परवानगी द्यायला का उशीर होत आहे, याचे कारण मला समजत नाही. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले असून, अजूनही मला त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले नाही.

भाजप आणि आम आदमी पार्टीतले सख्य जनतेसमोर उघड आहे. त्यामुळे परवानगी देण्यास विलंब करण्यात नक्की काय घोटाळा आहे? की राजकीय षडयंत्र आहे, हे समजणं जरा कठीण आहे. पण आता केजरीवाल यांना परवानगीसाठी उशीर झाला, तर ते सिंगापूरला समिटसाठी जाऊ शकतील का? हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल. पण त्यातून पुन्हा दोन्ही पक्षातले हेवेदावे समोर येतील, हे मात्र खरं….

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा