मी शरद पवार साहेबांसोबतच आहे, अजित पवारांना अमोल कोल्हे यांचा पहिला धक्का

पुणे, ३ जुलै २०२३ : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतल्यानंतर त्यांना पहिला धक्का बसला आहे. शपथविधीला हजर असणारे शिरुरचे-हवेली चे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो, शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है… पर दिल कभी नहीं #मी साहेबांसोबत, असे अमोल कोल्हे यांनी ट्वीट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी होऊन काल अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल २ जुलैला राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले जात होते. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का मनला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचे ट्वीट केले आहे.

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना बोटाला धरून उभे केल्याचा इतिहास आहे. काल अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल काल राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले जात होते. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचे ट्वीट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा