राज्यपालांनी जो काय निर्णय घ्यायचा तो खुशाल घ्यावा मला काहीही फरक पडत नाही- राजू शेट्टी

मुंबई, ३ सप्टेंबर २०२१: नुकतीच मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी राज्यपाल यांची १२ आमदारांच्या नियुक्ती या मुद्द्यावरून बैठक घेतली होती. राजू शेट्टी यांचे नाव यादीतून वगळले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेवर नवाब मलिक आणि अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केलं. मालिकांनी या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलं. तर आता राजू शेट्टी यांनी देखील याविषयी आपलं मत पत्रकारांसोबत मांडलं. मला यात कोणताही रस राहिलेला नसून माझं नाव वगळलं तरी मला फरक पडणार नाही असं मत राजू शेट्टी यांनी मानलं.
 
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “मी या गोष्टींचा कधीही पाठपुरवठा केला नाही. विशेष म्हणजे अलीकडे मला या गोष्टींमध्ये कोणताही रस राहिलेला देखील नाही. त्यामुळे राज्यपालांनी जो काय निर्णय घ्यायचा तो खुशाल घ्यावा मला काहीही फरक पडत नाही.” पुढे ते म्हणाले की, “सध्या मी पूरग्रस्तांसाठी संघर्ष करत रस्त्यावर उतरतोय. केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.”
 
 
काय म्हणाले अजित पवार
 
 
अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, असं म्हटलं जात आहे की नजीकच्या काळात पराभूत झालेल्या उमेदवारांना वगळलं जातं. अनेक वेळा काहीकाही ठिकाणी असं घडताना दिसला नाही. मोदी सरकारचे मंत्री अरुण जेटली हे देखील पराभूत झाले होते. तरीही त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर देखील घेण्यात आलं. 
 
 
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
 
 
या चर्चेत कोणतेही तथ्य नाही असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल लवकरच निर्णय घेतील अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच काही सूचना असल्यास त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकार आहेत याबाबत ते राज्यपाल सोबत चर्चा करतील असे देखील नवाब मलिक यांनी म्हटलं. 
 
 
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा