गोल पोस्ट राजकारण हा भूकंप आहे असं मी मानत नाही, संजय राऊतांनी केले अजित पवारांच्या...

हा भूकंप आहे असं मी मानत नाही, संजय राऊतांनी केले अजित पवारांच्या बंडाचे विश्लेषण

मुंबई, २ जुलै २०२३: पवार साहेबांशी माझी व उद्धव ठाकरेंची चर्चा झालीय, आम्ही मिळुन खंबीरपणे या परिस्थितीचा सामना करू. शिंदेंसेनेवर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यांच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता असल्यानेच, फडणवीसांनी अजुन एक इंजिन अजित पवार गटाच्या निमित्ताने या सरकारला जोडले आहे, असा वार संजय राऊतांनी केलाय.

ज्यांना तुरुंगात टाकायला शिंदे-फडणवीस जंग जंग पछाडत होते, त्या सगळ्यांना आता सरकारमध्ये घेऊन मंत्रीपदे देण्यात आलीयत, याचा अर्थ जनतेने समजुन घ्यावा. या मागे परवा पंतप्रधान मोदींनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील आरोपाची पार्श्वभूमी असुन, ईडी चा दबाव टाकूनच ही फोडाफोडी घडतेय, असा आरोप संजय राऊतांनी केलाय.

संजय राऊतांनंतर आता शरद पवार या घडामोडींवर काय बोलणार या कडे आता देशाचे लक्ष लागून राहिलंय. महाविकास आघाडीचे भविष्य काय? हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version