गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी मी नियमित गोमुत्र पिते “थोडं शेण पण खा! म्हणजे शहाणपणा येईल!” प्रज्ञा...

मी नियमित गोमुत्र पिते “थोडं शेण पण खा! म्हणजे शहाणपणा येईल!” प्रज्ञा साध्वी

नवी दिल्ली, १८ मे २०२१: देशभरात कोरोनानं हाहाकार माजवलाय. दिवसाला ४ हजार पेक्षा जास्त रुग्णांचा बळी जातोय तर प्राण वाचविण्यासाठी रुग्णांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं हाल होत आहे. तरीही देशात सत्तेवर असणाऱ्या नेत्यांनी तथ्य नसलेले विधान करून लोंकाची आक्रोश स्वतःवर ओढवून घेतल्याचं दिसत आहे.
मध्यंतरीच्या काळात भाजपचे नेते आणि उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी “कोरोना हा देखील एक जीव आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. ” असे होते. ज्यावरुन ते चांगलेच ट्रोल झाले होते. तर नेटिझन्सने त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे प्रकरण अजून ताजं असतानाच भाजपच्या खासदार प्रज्ञा साध्वी यांनी एक अजब विधान केलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप खासदार प्रज्ञा साध्वी यांनी “मी नियमित गोमुत्र पिते त्यामुळं मला कोरोनाची लागण झाली नाही” असं विधान केले. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकांनी त्यांना धारेवर धरत ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. एका ट्रोलरने तर थेट “थोडं शेण पण खा! म्हणजे शहाणपणा येईल!” असं म्हटलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव
error: Content is protected !!
Exit mobile version