पंढरपुर, १ जुलै २०२० : कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची पायी वारी रद्द करण्यात आली होती परंतू मानाच्या दहा पालख्या मात्र पंढरपुरात ढेरे दाखल झाल्या .
पांडुरंगाची सरकारी पुजा मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक व सह परिवार पंढरपुरात केली. सर्व पादुकांना भीमातीरी स्नान घालून गाव प्रदक्षिणा घालून नंतर त्या मंदिरात नेल्या गेल्या. मात्र यावेळी कोरोना वायरसमुळे पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरलाच नाही . त्यामुळे पंढरपुरात होणारा हरी नाम च्या गजराचा आज आवज फार काही ऐकण्यात येत नव्हता. या सगळ्यात पालख्यांचा मुक्काम आपापल्या मठातच होता.
यावेळी संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी, मुक्ताईनगर पंढरपुरातील मुक्ताई मठात मुक्ताईंच्या पादुकांच्या पालखीचा मुक्काम होता. यावेळी कोल्हापूरचे आय. जी. डॉ. सुहास वारके आणि अप्पर अधिक्षक अतुल झेंडे यांनी मुक्ताईच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र प्रल्हादराव पाटील यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी संस्थेचे विश्वस्त पंजाबराव पाटील, नीलकंठ मारके, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील व केशव पाटील हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी