मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यामुळे राज्यातील दंगली थांबल्या, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

नवी दिल्ली २७ जून २०२३: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादला भेट दिली आणि औरंजेबाच्या कबरीवर फुले वाहून नतमस्तक झाले. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना आणि भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांची भूमिका काय हे स्पष्ट करण्यास सांगितले.

उद्धव ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची काही दिवसापूर्वी युती झाली आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना निशाणा करत प्रश्नांचा भडीमार केला होता. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांना चांगलेच फटकारले आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आल्याचे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलय. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, माझ्या निर्णयामुळे राज्यातील दंगली थांबल्या, असे मोठे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा