“मी एक मोठा भाऊ गमावला” – आशा भोसले

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२०: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिग्गज संगीतकार पंडित जसराज यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. आशा भोसले म्हणाल्या ,”मी मोठा भाऊ गमावला आहे”. ८६  वर्षीय  गायिका आशा भोसले यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी आपले गुरू पंडित जसराज यांचे त्यांच्या जीवनातील महत्व सांगितले आहे. तसेच त्या म्हणाल्या,” पंडित जसराज जी यांच्या दुर्देवी निधनामुळे मला अतिशय दुःख झाले आहे. माझ्यावर अत्यंत प्रेमळ असलेला माणूस गमावला आहे, मी खरोखरच एक मोठा भाऊ गमावला आहे आणि संगीत का सूरज डूब गया” असं त्या म्हणाल्या.

तसेच त्या म्हणाल्या, ते माझे खूप कौतुक करत असे, आणि नेहमी म्हणायचे ” मैं तुम्हे गाना सिखाऊंगा “ असे आशा भोसले, पंडित जसराज यांच्या बद्दल आठवणी सांगताना म्हणाल्या. तसेच पंडित जसराज यांची अमेरिकेत शास्त्रीय शाळा आहे जिथे ते उत्कट कौशल्याना संगीत शिकवत असत. नंतर त्या म्हणाल्या की, ते कट्टर शाकाहारी असल्यामुळे जसराज जी मला आरोग्याच्या कारणास्तव शाकाहारी होण्यासाठी विनंती करत राहिले.

तसेच त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो आणि त्यांना अनेक  पुरस्कार ही मिळाले आहेत. तसेच त्यांच्या ९० व्या वर्षी निधन झाले असून त्यांनी ८० वर्ष संगीत जगतावर राज केलं आहे.

न्यूज अनकट  प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा