आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. या जामीनानंतरही चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असल्याने तिहाड कारागृहातच राहतील.
काय झाले ते जाणून घ्या
२० ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिंदाराम यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली. यातून सीबीआयला चिदंबरम यांचे कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट मिळाले. २१ ऑगस्ट रोजी सीबीआयने पी चिदंबरम यांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली. त्यानंतर सीबीआयने त्यांना २२ ऑगस्ट रोजी कोर्टामध्ये नेले. सीबीआयने कोर्टाकडे ५ दिवसांची एजन्सी कस्टडी मागितली होती. त्यानंतर कोर्टाने पी चिदंबरम यांना १४ दिवसांसाठी सीबीआय च्या ताब्यात तिहाड जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ३० सप्टेंबर रोजी पी चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळली. यानंतर विशाल कोकणे अशी परवानगी दिल्ली की, पी चिदंबरम यांची तुरुंगामध्ये सीबीआय चौकशी करू शकते तसेच गरज भासल्यास त्यांना अटकही करू शकते. १७ ऑक्टोबर रोजी कोर्टाने ईडी पी चिदंबरम यांची कस्टडी रिमांड चोवीस तारखेपर्यंत दिली. तसेच १८ ऑक्टोबरला सीबीआयने चार्जशीट दाखल केली त्यामध्ये आणखी तेरा जण दोशी म्हणून सापडले. त्यानंतर २१ ऑक्टोबरला कोर्टाने चार्जशीट स्वीकारली.