तुमच्या प्रार्थनेमुळे मी वाचले – राणा

12

पुणे, १६ ऑगस्ट २०२०: खासदार नवनीत राणा कोर यांची प्रकृती कोरोनामुळे ढासाळत चालली होती. त्यामुळे त्यांना अमरावतीवरुन नागपूरला हलविण्यात आले. तिथेही तब्येतीमधे सुधारणा नाही झाली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणुन मग त्यांना मुंबईला आणण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा कोर यांच्यावर उपचार सुरु आहेत. श्वास घेण्याचा आणि फुफ्फुसाचा त्यांना त्रास जाणवु लागल्याने त्यांना आयसीयु (ICU) वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयु वाॅर्डातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एक व्हिडीयो शेयर केला. ज्यामधे “अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यामुळे मी मरता मरता वाचले, आता माझी तब्येत ठिक आहे. धन्यवाद” असे म्हणत त्यांनी लोकांचे आभार मानले आहे.

नवनीत राणा कोर यांच्या घरातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात त्यांच्या लहान मुला सह संपुर्ण कुटुंबाचा देखील समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी