पुणे, १ जुलै २०२० : आज बुधवार , आषाढी एकादशी .२१ दिवस पायी चालत अनेक वारकरी पंढरपुरात पोहचतात व त्या पांडुरंगाच्या सावळ्या रूपाचे दर्शन घेतात. परंतू यावर्षी पायी वारी झालीच नाही.
दरवर्षी पावसानंतर झाडी झोडपाने हिरव्या गर्द झालेल्या घाटातून पालखी जात असताना ते विलोभनीय दृष्य डोळ्याचे पारणे फेडते. परंतू यावर्षी हे दृष्य पाहणे झाले नाही त्याच बरोबर घाटात उभारलेल्या ६५ विठ्ठलाच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचे भाग्य देखील वारक-यांना मिळाले नाही.
पण आज आषाढी एकादशी निमित्त दिवे घाटातील ६५ फुटी विठ्ठलाच्या मुर्तीची पुजा शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाली. यावेळी बोलताना, डॉ कोल्हे म्हणाले की, श्री विजय कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून व मुर्तिकार सागर भवसार यांनी घडवलेल्या या ६५ फुटी विठ्ठलाच्या मुर्तीची पुजा करण्याचा मान मिळाला हे माझे भाग्यच. ”
याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते प्रविण तरडे, विनोद सातव, अमोल हरपळे, गणेश लोणारे, लीड मिडियाचे विनोद सातव उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी