मी माझ्या कामाच्या जोरावर निवडून येणार : हेमंत रासने

पुणे, ६ फेब्रुवारी २०२३ : विरोधी उमेदवार कोण आहे, हे पाहून मी निवडणूक लढवीत नाही. भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहयोगी पक्षांचा उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून जे काम केलं आहे त्या जोरावर निवडणूक लढवीत आहे, असे मत भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती यांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रासने बाहेर पडले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजीनाट्याच्या चर्चेवर बोलताना रासने म्हणाले, की निवडणुकीमध्ये अनेकजण उमेदवारी मागत असतात; परंतु उमेदवारी एकालाच मिळत असते. उमेदवारी मिळाली नाही असे म्हणून नाराज होण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे जे इच्छुक होते ते आज माझ्यासोबत आहेत. गेल्या निवडणुकीतही मी उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने मुक्ताताई टिळक यांना उमेदवारी दिली. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यासोबतच शहरातील स्थानिक पदधिकारीही सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा