इंग्लंड, ६ सप्टेंबर २०२०: इंग्लंडचा फलंदाज इयान बेलने २०२० च्या घरगुती हंगामाच्या शेवटी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. बेल २०१२ मध्ये भारत दौर्यावर कसोटी मालिका जिंकणार्या इंग्लंड संघाचा सदस्य होता. बेल २०१५ मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.
पाच वेळा अॅशेस विजेता आपल्या कारकीर्दीत वार्विकशरकडून खेळला. बेलने ११८ कसोटी सामन्यांत २२ शतकांसह ४२.६९ च्या सरासरीने ७७२७ धावा केल्या, तर १६१ एकदिवसीय सामन्यात ५४१६ धावा जोडल्या.
बेल म्हणाले की, ” दुःखी मनाने पण अभिमानाने व्यवसाय क्रिकेटमधून मी संन्यास घेण्याचं घोषित करत आहे.” बेल २०१२ मध्ये भारत दौर्यावर कसोटी मालिका जिंकणार्या इंग्लंड कसोटी संघाचे सदस्य होते.
३८ वर्षीय वयाच्या इयान बेल यांनी २०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाले, परंतु त्याच वर्षी त्यांनी शेवटची कसोटीही खेळली. नोव्हेंबर २०१५ पासून त्यांना इंग्लंड कसोटी संघात स्थान मिळवता आले नाही.
इयान बेलने २००४ मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इयान बेलने १६१ सामन्यांत ५ हजाराहून अधिक धावा केल्या आणि ४ शतके व्यतिरिक्त ३५ अर्धशतकेही केली. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने ७ सामने खेळले आणि १८८ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे