नवी दिल्ली: आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला समाधानकारक कामगिरी करता न आल्याने भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे.
याचा फटका भारतीय महिला खेळाडूंना आयसीसीच्या जागतिक क्रमवारीतही बसला आहे. मागच्या आठवड्यात अव्वल स्थानी विराजमान असलेली शेफाली वर्मा तिसऱ्या स्थानी घसरली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर शेफालीनं ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर अव्वल स्थान पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली.
सध्या ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी २ स्थानांच्या सुधारणेसह ७६२ गुणांची कमाई करून टॉपवर पोहोचली आहे. मूनीनं संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २६९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत महिला खेळाडूंना मोठा फटका सहन करावा लागला.