ICICI बँकेने चौथ्या तिमाहीत सादर केले उत्कृष्ट निकाल, भागधारकांना मिळेल इतका डिविडेंड

मुंबई, 24 एप्रिल 2022: खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 59 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत 7,019 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे बँकेने म्हटलंय. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेला 4,403 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

आर्थिक वर्षात खूप वाढला नफा

ICICI बँकेचा निव्वळ नफा 2021-22 या आर्थिक वर्षात वार्षिक 44 टक्क्यांनी वाढून 23,339 कोटी रुपयांवर पोहोचलाय. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा 16,193 कोटी रुपये होता.

वाढलं व्याज उत्पन्न

बँकेने रेगुलेटरी फाइलिंगमध्ये सांगितलंय की आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत, बँकेला व्याजातून 12,605 कोटी रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं. 2020-21 या आर्थिक वर्षातील 10,431 कोटी रुपयांच्या निव्वळ उत्पन्नापेक्षा हे प्रमाण 21 टक्के अधिक आहे.

ICICI बँकेने या वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत ट्रेझरी उत्पन्न वगळता 4,608 कोटी रुपये गैर-व्याज उत्पन्न मिळवले. 2020-21 च्या चौथ्या तिमाहीतील 4,137 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम 11 टक्के अधिक आहे.

प्रोविजन मध्ये कपात केल्याने वाढला नफा

तरतुदीत कपात केल्यामुळं नफ्यात ही वाढ झाल्याचं बँकेने म्हटलंय. 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत, कर वगळून तरतूद वार्षिक 63 टक्क्यांनी घसरून 1,069 कोटी रुपये झाली. आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत हा आकडा 2,883 कोटी रुपये होता.

लाभांश जाहीर

बँकेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलंय की, बँकेच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 5 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, बँकेच्या एकूण शाखांची संख्या 5,418 आणि एटीएमची संख्या 13,626 होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा