मुंबई, ७ जानेवारी २०२१: उभ्या जगाचा पोशिंदा आसलेल्या शेतकरी बळीराजा नेहमीच खडतर आयुष्य जगत आसतो. संपूर्ण जगाचे पोट भरण्याचे काम शेतकरी निस्वार्थ पणे करत आसतात. त्यातच त्यांच्या शेतमालाला भाव नेहमीच हालाकीचे भेटत आसतात. दुप्पट मेहनत आणि एक पट दाम असे भाव देतात.
शेतीचे काम करता करता शेतकर्याला कर्जाचा भार उचलावा लागतो. पीक पिकवताना डोक्यावराचा कर्जाचा डोंगर उभा असताना ही, शेतकरी शेतात कष्ट करून घाम गाळून आनंदाने पीक पिकवतो. पण, त्या कष्टाचे चीज होत नाही. म्हणून शेतकरी स्वताच्या आयुष्याला संपवतो आणि याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येची गेल्या पाच वर्षातील आकडेवारी समोर आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात १ हजार ३४७ शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची संख्या जास्त हाती लागली आहे. त्यानुसारची आकडेवारी पुढील प्रमाणे.
मालेगाव ५३, बागलाण ३७, निफाड ३१, दिंडोरी ३१, नांदगाव २७, चांदवड १९, सिन्नर १४, येवला १२, कळवण १२, देवळा ७, नाशिक ४, त्र्यंबकेश्वर ४, इगतपुरी २, पेठ १, सुरगणा १ अशी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची संख्या आहे. एकूण २२७ शेतकर्यांनी आपला जीवन प्रवास संपवला.
महाराष्ट्रातील फक्त नाशिक जिल्ह्याची हि स्थिती आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील शेतकर्यांची हीच गत आहे. नेहमीच बळीराजाला सावकारी, कर्जबाजारीपणा आणि कुठेतरी सरकारच्या शेतकर्यांप्रतीच्या ढिसाळ धोरणांमुळे हि परिस्थिती शेतकर्यांवर ओढावली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव