दिल्ली: अजाच मुंबई हल्ल्याला ११ वर्ष पूर्ण होत आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात नागरिकांसह अनेक पोलिस अधिकारीही शहीद झाले होते. तर काल दिल्लीत तिघांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत काल पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. आसाम मधील गोलपाडा येथून आलेल्या तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांचा अटक केली. त्यांच्याजवळ आय इ डी ही स्फोटके सापडली. मुकद्दिर इस्लाम, रंजीत आली आणि जमाल अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व वर्गमित्र असून जमाल बारावी उत्तीर्ण झालेला आहे तर इस्लाम हा वाहनचालक असून मासे विक्रीचा व्यवसाय करतो तसेच रंजीत अली हा मासे विक्रेत्याकडे मॅनेजर म्हणून काम करतो.