जीडीपी या वेगानं वाढला तर 2035 पर्यंत पूर्ण होईल 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न!

India GDP, 2 फेब्रुवारी 2022: 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024-25 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन बनवण्याचं स्वप्न दाखवले होतं. जुलै 2019 मध्ये पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एक प्रकारचा रोडमॅप देखील सादर करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी 2019 पासून आतापर्यंत अनेक प्रसंगी या स्वप्नाचा उल्लेख केलाय. तथापि, कोविड-19 मुळं परिस्थिती खूप बदलली आहे. अशा परिस्थितीत 2024-25 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होऊ शकते का याचं विश्लेषण करूया.

कोविडपासून परिस्थिती बदलली

अर्थव्यवस्थेचा आकार जुलै 2019 मध्ये $2.70 ट्रिलियन होता. 2020 मध्ये ते सुमारे $2.9 ट्रिलियनवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर कोविड-19 च्या दणदणाटानं सरकारचं हे स्वप्न निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. कोविड-19 मुळं 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत आर्थिक घडामोडी पूर्णपणे ठप्प झाल्या. 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ दिसून आली आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा $ 2.7 ट्रिलियनवर आली तेव्हा त्याचा परिणाम GDP डेटावर देखील दिसून आला.

वर्षात 2.5 एवढीच वाढ

5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाबाबत सरकारच्या घोषणेला जवळपास अडीच वर्षे उलटून गेली आहेत. चालू आर्थिक वर्षातील विकास दराबाबत RBI चा अंदाज (9.5%) लक्षात ठेवला तर असं म्हणता येईल की मार्च 2022 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे $3 ट्रिलियन असंल. अशाप्रकारे, गेल्या 2.5 वर्षांत जीडीपीचा आकार सुमारे 11 टक्क्यांनी वाढलाय. जर कोविड-19 सारखे बाह्य घटक आपल्याला असेच त्रास देत राहिले आणि देशाची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहिली तर आपण 2035-36 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकू.

असं गाठता येईल 2028 पर्यंत उद्दिष्ट

अर्थ मंत्रालय सोमवारी आर्थिक आढावा प्रसिद्ध करंल आणि सरकार 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करंल अशी अपेक्षा आहे. 11 टक्क्यांऐवजी 10 टक्के सरासरी वाढीचा हिशोब केला, तर 2027-28 या कालावधीत आपण हे लक्ष्य गाठू शकू, असं म्हणता येईल.

8% च्या सरासरी वाढीसाठी लागंल इतका वेळ

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या आकारमानानुसार, जर आपण वार्षिक सरासरी 8% वाढीचा दर विचारात घेतला, तर आपल्याला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी सरकारच्या लक्ष्यापेक्षा खूप जास्त वेळ लागंल. या गणनेनुसार, 2029-30 च्या आसपास आपण 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकू.

लक्ष्य गाठण्यासाठी हा स्ट्राइक रेट आवश्यक

2024-25 पर्यंत देशाला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य सरकारला साध्य करायचं असंल, तर त्याला दरवर्षी किमान 19% च्या GDP वाढीची आवश्यकता असंल. विकासाचा हा दर गाठणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि या दृष्टीनं असं म्हणता येईल की 2024-25 पर्यंत हे लक्ष्य गाठणं खूप आव्हानात्मक आणि कठीण असंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा