गोल पोस्ट राजकारण आ.पवारांना वेळ नसेल तर राजेंद्र फाळके यांना आमदार करा : प्रा. राम...

आ.पवारांना वेळ नसेल तर राजेंद्र फाळके यांना आमदार करा : प्रा. राम शिंदे

कर्जत, दि.२जून २०२०: कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना तालुक्यातील जनतेकडे लक्ष्य देण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे स्थानिक व्यक्ती राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेत संधी द्यावी. अशी मागणी माजी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे केली .

कर्जत येथे कुकडीच्या आवर्तनचा भोंगळ कारभार जनतेसमोर मांडताना त्यांनी आमदार रोहित पवार यांना कर्जतच्या जनतेकडे लक्ष्य देण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेत संधी द्यावी. अशी मागणीच केली आहे. या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादी समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, कुकडीच्या पाण्याचा कोणताही समन्वय नाही. नियोजनाचा अभाव देखील पाहण्यास मिळत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करायला आमदार रोहित पवार यांना वेळच नाही. ते महाराष्ट्र आणि देश व देशाबाहेरील प्रश्न सोडवत असल्याचे दिसत आहेत. तालुक्यातील शेतकरी मोडकळीस आला आहे. कर्जत मधील शेतक-यांवर अन्याय झाला आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version