आमदारांनी लेखी उत्तर न दिल्यास समोर येऊन म्हणणे मांडता येणार,अपात्र आमदार प्रकरणात नार्वेकर यांचा मोठा निर्णय

मुंबई, ९ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात एक वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ४० आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. यानंतर शिंदे यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला.

दरम्यान ठाकरे गटाने १६ आमदारांना अपात्र ठरविन्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले तर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविन्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. या घटनेन तर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असे सांगितले होते. आमदार अपत्रतेवर विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच प्रकरणी ठाकरे गटाकडून आमदार सुनिल प्रभू यांनी पुन्हा सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याचदरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १५ आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्रता प्रकरणात नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर यात आता मोठा दुसरा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नार्वेकर यांनी, जर आमदारांना लेखी उत्तरे देता आले नाही. तर त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून म्हणणे मांडता येणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदार काय करतात हेच पाहने महत्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा