विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन करणार

मुंबई, २ सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यामुळे झालेल्या टाळेबंदी मुळे राज्यातील सर्व क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाला आहे व त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही. मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता अभाविप आपल्याकडे पुढीलप्रमाणे काही मागण्या करीत आहे.

कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी, सरासरीच्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे,स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी, या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडणार आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वरिल समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा अभाविप संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.असे निवेदन अभाविप जिल्हा संयोजक समीर मारकडं, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य वैभव सोलनकर,स्वप्नील देवकाते, अक्षय नाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा