२४ तासात इतकी संख्या वाढली तर, ३१ ऑगस्ट पर्यंत भारतात ३२ लाख कोरोना रुग्ण….

6

भारत, १९ जुलै २०२०: भारतात कोरोनाने थैमान घातले आसून देशात गेल्या २४ तासात ३४ हजार ८८४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. ३० हजाराचा टप्पा पार करण्याचा हा सलग तिसरा दिवस आसून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचली आहे.६ लाख ५३ हजार ७५० कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले आहेत, तर करोनामुळे  मरण पावलेल्यांची संख्या २६ हजार २७३ मृत्युची नोंद झाली आहे.

तर राज्याची परिस्थिती ही चिंताजनकच आहे.राज्यात आज सलग तिसर्या दिवशी कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर राज्यात एकुण रुग्णसंख्या ३ लाख ९३७ वर पोहचली आसून १ लाख ६५ हाजार ६६३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के झाले आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांंगितले आहे.

भारतात पुढील १० लाख कोरोना बाधितांचा टप्पा येत्या ३ आठवड्यात गाठला जाण्याची शक्‍यता आहे, असे भाकित आरोग्य अर्थतज्ज्ञ रिजो एम. जॉन यांनी व्यक्‍त केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारत २० लाख बाधितांचा टप्पा १० ते ११ ऑगस्ट रोजी ओलांडेल. तर ३० लाख बाधितांचा टप्पा २८ ते २९ ऑगस्ट रोजी ओलांडेल. ३१ ऑगस्टला भारतात ३२ लाख कोरोनाबाधित असतील. वाढीचा वेग लक्षात घेऊन हे अनुमान काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात २२ जुलैच्या सुमारास १० लाख बाधित असतील असा अंदाज त्यांनी ८ जून रोजी मांडला होता. भारताने ही संख्या १६ जुलैला ओलांडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा