जर तुम्ही सुद्धा वापरत असाल हे पासवर्ड तर व्हा सावध

7

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२०: जर तुम्ही सहज लक्षात राहण्यासाठी साधारण व लहान अक्षरांचा पासवर्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. नॉर्डपास’नं जारी केलेल्या रिपोर्टमध्ये सर्वाधिक वापर होणाऱ्या पासवर्डची यादी देण्यात आली आहे. हे कॉमन पासवर्ड कोणीही सहज वापरून तुम्हाला मोठं नुकसान पोहोचू शकतात. त्यामुळं जर तुम्ही देखील या यादीमधील कोणता पासवर्ड वापरत असाल तर त्वरित त्यात बदल करा.

यासंदर्भात नॉर्डपास कडून एक रिपोर्ट जारी करण्यात आलाय. नॉर्डपासच्या या रिपोर्टनुसार २०२० या वर्षात तब्बल २,७५६,९९,५१६ पासवर्ड लीक झाले आहेत. युजर्स कशाप्रकारचे पासवर्ड ठेवतात, ते पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी काय करतात, याबाबतची माहितीदेखील या रिपोर्टमध्ये मांडण्यात आली आहे. तसेच एखादा पासवर्ड किती जणांनी, किती वेळा वापरला आहे. एखादा पासवर्ड किती वेळा लीक झाला आहे. याबाबतचा डेटा सादर केला आहे.

कंपनीनं काही पासवर्ड क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो, किंवा ठराविक प्राकरचा पासवर्ड क्रॅक करण्यास हॅकरला किती वेळ लागू शकतो याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार १२३४५६, १२३४५६७८९, picture1, password, आणि १२३४५६७८ हे पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात. यापैकी picture1 हा पासवर्ड सोडला तर बाकीचे सगळे पासवर्ड अवघ्या काही सेंकंदांमध्ये क्रॅक करता येतील.

सर्वाधिक वापरले जाणारे टॉप २० पासवर्ड्स

123456
123456789
picture1
password
12345678
111111
123123
12345
1234567890
senha
1234567
qwerty
abc123
Million2
000000
1234
iloveyou
aaron431
password1
qqww1122

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा