पुणे, ८ मार्च २०२१: सध्या काळ बदलत चालला आहे.आणि बदलत्या काळाबरोबर मानवी जीवन देखील आता फास्ट झाले आहे. आज प्रत्येकाला वाटतं आपण फिट आणि ताजंतवाने राहवं. आपलं शरीर हे आळशी बनू नये म्हणून अनेक जणं वाटेल ते करतात. म्हणजे सकाळी लवकर उठणं व्यायम करणं पौष्टिक आहार घेणं चालू आसते.
हे झालं नेहेमी फ्रेश आणि ताजंतवाने राहणार्या लोकांविषयी चे मात्र, तुम्हाला माहीत आहे का? आळशी आसणार्या व्यक्तीं बद्दल. जे आळशी राहतात ते फारच सुस्त राहतात. त्यांच्या झोपण्याचे खाण्याचे काही जास्त ताळमेळ नसतो पण, आज आपण याच आळशी व्यक्तीमत्वामधील चांगल्या गुणवैशिष्टा बद्दल जाणून घेणार आहोत.
आळशी असण्याचे हे आहेत फायदे…..
आळशी माणूस अवघड काम कसं सोपं होईल याचा शोध लावतो.
आळशी माणूस काम कसं लवकरात लवकर पुर्ण होईल याकडे जास्त लक्ष लावतो.
आळशी माणसं एकच काम करतात पण ते परफेक्ट करतात. कारण ते काम दुसर्यांदा करणं त्यांना आवडत नाही.
जगातील सर्वात श्रीमंत “बिल गेट्स म्हणतात” कठीण काम करण्यासाठी मी आळशी माणसाची निवड करेन, कारण अवघड काम तो सोपा करण्याचा मार्ग तो लवकर शोधून काढेल.
त्यामुळे आता तुम्हाला कोणी आळशी म्हटलं तर मग तुम्ही बिंदास्त त्यांना तुमची हि वरील खुबी दाखवू शकता आणि निवांत आपले आयुष्य जगू शकता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव
