“अर्णव प्रकरणी व्यक्तिगतपणे लक्ष करत असल्यास…” सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर २०२०: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई न्यायालयानं दिलेल्या अंतरिम जामीनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं विचारधारेतील मतभेदावरून टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांना नागरिकांच्या स्वातंत्र्यावरून इशाराही दिला.

अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली आहे. सत्र न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं सलग तीन दिवस त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. त्यांना पुन्हा सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडताना गोस्वामी यांना वैचारिक मतभेद असल्यानं राज्य सरकारकडून टार्गेट केलं जातं असल्याचं सांगण्यात आलं.

या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालायनं चिंता व्यक्त केली. “जर राज्य सरकारं व्यक्तिगतरित्या टार्गेट करत असतील, तर त्यांनी लक्षात घ्यावं की, नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे,” असं न्यायालयानं म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा