तुम्ही ज्ञानवापी मशीद म्हणणार तर वाद होणार, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य

लखनऊ, ३१ जुलै २०२३ : सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वे करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तीन ऑगस्टला हायकोर्ट यावर निर्णय देणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केससंबंधी महत्वाच वक्तव्य केले आहे. तुम्ही ज्ञानवापी मशीद म्हणणार, तर वाद होणार असे योगी आदित्यनाथ म्हणाले. देवाने दृष्टी दिली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता, त्रिशूळ मशिदीत काय करतय? ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. त्या भिंती काय सांगत आहेत? अशी ऐतिहासिक चूक झाली आहे, त्यावर तोडगा निघाला पाहिजे, असा प्रस्ताव मुस्लिम समाजातून आला पाहिजे असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर डॉ.एस टी हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ ची तयारी सुरु आहे. तिथे ३५० वर्षांपासून नमाज अदा केली जात आहे, तर मशीद म्हणायच नाही, मग काय म्हणायचे?. मुख्यमंत्र्यांनी अशी विधान करु नयेत. चौकशीत स्पष्ट होईल, तिथे काय आहे असे एसटी हसन म्हणाले. संसदेवर त्रिशूळ बनवले, मग संसेदला मशीद म्हणायच का? मुस्लिमांनी नेहमी मोठे मन दाखवले आहे. बाबरीच्यावेळी सुद्धा असेच झाले होते असे एसटी हसन म्हणाले.

ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरीशी संबंधित विषय सध्या न्यायालयात आहे. काही महिलांनी मशीद परिसरातील श्रृंगार गौरी क्षेत्रात पुजेची परवानगी मागितली होती. या अर्जात सर्वेची मागणी करण्यात आल होती. स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार, या परिसरात सर्वे सुरु करण्यात आला होता. ज्यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता. मशिदीच्या आत शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. मुस्लिम बाजूने हा फव्वारा म्हटला आहे.आता एएसआय ने सर्वे सुरु करताच विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हायकोर्टाकडे जाण्यास सांगितले. हायकोर्टाने सुनावणी केली. तीन ऑगस्टला निकाल देणार आहे. तो पर्यंत एएसआय सर्वेवर बंदी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा