कोरोना सारखे आजार टाळायचे असतील तर पर्यावरण स्नेही जीवन जगावे: डॉ. प्रदीप आवटे

6

पुरंदर, १९ डिसेंबर २०२०: माणुस, पर्यावरण आणि प्राणी यांचे आरोग्य एकमेकांशी निगडीत असून भविष्यात करोना सारख्या साथी टाळण्यासाठी आपण पर्यावरण स्नेही जीवन शैली आणि शाश्वत विकासाची कास धरली पहिजे. भविष्यात करोना सारखे अनेक आजार येण्याची शक्यता आहे. मात्र, करोना सारख्या रोगाने मानुसकी हरवली असल्याचे मत डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले आहे.

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथिल महर्षी वाल्मिकी विध्यालया मध्ये आदर्श ८९ व नवदिशा फाऊंडेशनच्या वतिने ‘करोना भिती नको काळजी घ्या’ या विषयी राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी अंधश्रध्दा सोडुन विज्ञानाच्या मदतीने करोनाच्या सारख्या इतर महामारी वर मात करु शकतो असे मत व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच अमोल खवले, प्राचार्य चंद्रकांत जाधव, प्रमोद शहा, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, संदीप दुर्गाडे, ८९ फाऊंडेशनचे रावसाहेब चव्हाण, दादासाहेब राऊत, महावीर भुजबळ, तुषार भुजबळ, सुरेश भुजबळ उपस्थीत होते. यावेळी कोविड़ योद्धा म्हणून शिक्षक विशाल ठाकुर व जिल्हा परिषदेच्या शिक्षिका किर्ती लिपारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आर्थिक दुर्बल घटकातील दोन विध्यर्थिनीना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. ८९ फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. निलेश शहा यांच्या वाढदिवसा निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी पद्मश्री भुजबळ हिने केले, तर आभार पर्यवेक्षक बाबासो कुंभार यांनी मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा