जगभरातील मानाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक समजला जाणारा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फि) गोव्यात रंगणार आहे. हा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
महोत्सवाचे हे 50 वे वर्ष असून वेगवेगळ्या देशांमधील 200 पेक्षा अधिक चित्रपट याठिकाणी प्रदर्शित होणार आहेत.
खास आकर्षण :
▪ या महोत्सवात हिंदी, इंग्रजी चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील 26 चित्रपटांचा समावेश; 5 मराठी चित्रपटहि दाखवण्यात येणार.
▪ 15 नॉन फिचर चित्रपट तसेच 50 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.
▪ महानायक अमिताभ यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे दर्जेदार चित्रपटही महोत्सवात दाखवण्यात येणार.
या मराठी चित्रपटांचा समावेश :
▪ सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला ‘
▪ समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ ‘
▪ शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’
▪ अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५’
▪ आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’