नाकाबंदी दरम्यान गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

16
Illegal cattle trafficking in Yavatmal
नाकाबंदी दरम्यान गोवंशाची अवैध वाहतूक उघड

Illegal cattle trafficking in Yavatmal: पोलीस ठाणे वडकी हद्दीत नाकाबंदी दरम्यान एका आयशर वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने पलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १२ बैल आणि एकूण २२लाख 40 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 40 CM 3230 असा अवैध गोवाशांची वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीचा क्रमांक असून त्यामधून गोवंशाची कत्तलीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती.सदर वाहन तपासणीअंती त्यात १२ बैल आढळून आले. या गोवंशाची एकूण किंमत सुमारे २,४०,०००/- इतकी आहे. तर वापरात असलेले आयशर वाहनाची अंदाजे किंमत २०,००,००० लाख आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

आता याप्रकरणी आबिद नूर कुरेशी (वय २६, रा. महेंद्र नगर, नागपूर) आणि जगदीश भीमराव लिंगायत (वय ३७, रा. ओले नगर, कोराडी, नागपूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 अ, 5 ब तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सचिन झिटे